भारतात 24 तासात 3,23,144 नवे कोरोना रुग्ण

Share This News

नवी दिल्ली,  27 एप्रिल

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 3,23,144  नवे कोरोना रुग्ण आढळले असून  2771 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 2,51,827  नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे 1,76,36,307 रुग्ण झाले असून एकूण 1,45,56,209 नागरिक बरे झाले आहेत. 

एकूण सक्रीय रुग्ण संख्या 28,82,204 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 1,97,894 आहे.

आतापर्यंत देशात 14,52,71,186 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 16,58,700  नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 28,09,79,877  चाचण्या घेण्यात आल्या.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.