रेमडेसिवीरचं सर्वाधिक ३४ टक्के वितरण महाराष्ट्राला!

Share This News

नागपूरः राज्यातील आघाडी सरकारमधील नेते कितीही कांगावा करीत असले तरी रेमडेसिवीरचे सर्वाधिक म्हणजे तब्बल ३४ टक्के वितरण एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने याबद्धल आश्वासित केलं होते. त्यानुसार अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमडेसिवीरचे सर्वाधिक वितरण होत आहे. नव्याने जाहीर झालेल्या वितरणात ५ लाखां इंजेक्शन्सपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख ६५ हजार ८०० म्हणजेच ३४ टक्के इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत. तर आतापर्यंतच्या एकूण १६ लाख रेमडेसिवीरपैकी ४ लाख३५ हजार महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहेत, असेही त्यांनी नमूद केलं आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.