देशात ३६,६0४ नवे कोरोनाबाधित, ५0१ मृत्यू

Share This News

नागपुरात ४५३ पॉझिटिव्ह, ११ बळी
जिल्ह्य़ात बुधवारी ४५३ नवे कोरोनाबाधित आढळले असून शहरातील ६, ग्रामीणमधील ३ व इतर जिल्ह्यातील २ अशा ११ बळींची नोंद करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ३,६९२ वर पोहचली आहे. बुधवारला आरटीपीसीआरच्या ४४0४ व रॅपिडच्या ११0९ अशा ५५१३ चाचण्या करण्यात आल्यात. त्यामध्ये ग्रामीणमधून ७५, शहरातील ३७६ व इतर जिल्ह्यातील २ अशा ४५३ नव्या बाधितांची नोंद झाली. यात रॅपिड अँन्टिजेन तपासणीव्दारे केवळ ३५ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. एम्समधून २३, मेडिकलमधून ५१, खासगी लॅबमधून १७६, मेयोतून ६५, माफसूच्या प्रयोगशाळेतून २२, नीरीतून ४३ व नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून ३८ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत.नवे कोरोनाबाधित
नागपूर – ४५३
अमरावती – ७६
चंद्रपूर – १६८
गडचिरोली – ४२
वाशीम – २२ गोंदिया – ४८
वर्धा – ५६
देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९५ लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये ३६ हजार ६0४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ९४ लाख ९९ हजार ४१४ झाली आहे. तर, याच कालावधीत ५0१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
आजपयर्ंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशभरातील एकूण संख्या आता १ लाख ३८ हजार १२२ झाली आहे. तर, अँक्टिव्ह रुग्ण संख्या ४ लाख २८ हजार ६४४ वर आहे. याशिवाय मागील २४ तासांमध्ये ४३ हजार ६२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे आतापयर्ंत कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळालेल्यांची देशातील एकूण संख्या आता ८९ लाख ३२ हजार ६४७ झाली आहे. याशिवाय कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर १ डिसेंबरपयर्ंत देशभरात १४,२४,४५,९४९ नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. यापैकी १0 लाख ९६ हजार ६५१ नमूने काल तपासण्यात आले आहेत. संपूर्ण देशाला करोना प्रतिबंधक लसीकरणाची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.