३७५ जणांची कोरोनावर यशस्वी मात
नागपूर |
कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने प्रशासनही समाधानी आहे. रविवार, १७ जानेवारी रोजी दिवसभरात आणखी ३७५ जण ठणठणीत होऊन घरी परतलेत. तर ३२९ नव्या बाधितांची भर पडली. रविवारी शहरातील ३३९ व ग्रामीणचे ३६ असे ३७५ जण बरे होऊन घरी परतलेत. अर्थात ते कोरोनामुक्त झालेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख २२ हजार १८४ वर गेली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६५ टक्क्यांवर पोहोचले आहेत. रविवारी शहरातील ३, ग्रामीणचे २ व इतर जिल्ह्यातील ३ अशा ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ४0७२ वर पोहोचली आहे. यातील ६५३ मृतक हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. दिवसभरात ३१३२ चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी शहरातून २७२, ग्रामीणमधून ५४ तर इतर जिल्ह्यातील ३ अशा नव्या ३२९ बाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) विषाणू प्रयोगशाळेतून १५ जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत. मेडिकलधून ३९, मेयोतून ३९, खासगी प्रयोगशाळेतून १२२, नीरीच्या विषाणू प्रयोगशाळेतून १८, नागपूर विद्यापीठाच्या विषाणू प्रयोगशाळेतून ४४ तर रॅपिड अँन्टिजेन तपासणीद्वारे ५२ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३0 हजार ४६९ वर पोहोचली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्याबाहेरील ८३५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता पुन्हा बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटत आहे. आजघडीला शहरातील ३२0१ व ग्रामीणमधील १0१२ असे जिल्ह्यात केवळ ४२१३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १२१९ जणांना सौम्य व मध्यम लक्षणे असल्याने ते शासकीय, खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये उपचार घेत आहेत. तर लक्षणे नसलेले २९९४ जण गृह विलगीकरणात आहेत. सक्रिय रुग्णांची घटती संख्या ही प्रशासनासाठी समाधानाची बाब ठरत चालली आहे. |