देशात ३,७९,२५७ कोरोनाबाधित, ३६४५ मृत्यू

Share This News

नागपूर – ७४९६ चंद्रपूर – १७४१
यवतमाळ – ८८५
गडचिरोली – ५६१
अमरावती – ९३४
वर्धा – ८२0
गोंदिया – ५७४
भंडारा – १११0
वाशीम – ५२४नागपुरात ७४९६ कोरोनाबाधित, ८९ मृत्यू


नवी दिल्ली : नागपूर जिल्ह्याचा कोरोनाचा प्रकोप कमी होताना दिसत नाही. शासनाने कडक निर्बंध लादले असले तरी रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. तर आतापर्यंत जिल्ह्यात नोंद झालेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखावर गेली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ७ हजार ४९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. शहरात दिवसभरात ४९, ग्रामीण भागात ३३, जिल्ह्याबाहेरील ७ असे एकूण ८९ मृत्यू जिल्ह्यात नोंद झाले. त्यामुळे शहरातील आजपयर्ंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ४४१, ग्रामीण १ हजार ८१४, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ४५ अशी एकूण ७ हजार ३00 रुग्णांवर पोहोचली आहे. तर शहरात २४ तासांत ४ हजार ४२२, ग्रामीण ३ हजार ६७, जिल्ह्य़ाबाहेरील ७ असे एकूण ७ हजार ४९६ नवीन रुग्ण आढळले.
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठले आहेत. भारतात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाख ७९ हजार २५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी असून ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.


देशात रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापयर्ंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ६९ हजार ५0७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापयर्ंत १ कोटी ५0 लाख ८६ हजार ८७८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ३0 लाख ८४ हजार ८१४ अँक्टिव्ह रुग्ण असून १५ कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.