एमपीएससी परीक्षेला ३८ टक्के परीक्षार्थ्यांची पाठ

Share This News

चंद्रपूर : सतत सहा वेळा समोर ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रविवारी चंद्रपूर शहरातील १३ केंद्रावर पार पडली. या परीक्षेला ३८ टक्के परीक्षार्थ्यांनी पाठ फिरवली. नागपूर विभागातून एमपीएससी परीक्षेसाठी चंद्रपूर शहरातील १३ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९३८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी पहिल्या पेपरला १,५०३ तर दुसऱ्या पेपरला १,५१७ परीक्षार्थी गैरहजर असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएसी राज्यसेवा सामाईक परीक्षेची जाहिरात २०१९ ला निघाली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणे अपेक्षित होते. परंतु, विविध कारणाने ही परीक्षा सतत समोर ढकलण्यात आली. मात्र युवकांनी आंदोलन केल्यानंतर २१ मार्च रोजी ही परीक्षा शहरातील १३ परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात आली. शहरातील परीक्षा केंद्रावर ३ हजार ९३८ परीक्षार्थी परीक्षा देणार होते. पहिल्या पेपरसाठी २,४२१ परीक्षार्थी हजर तर १,५०३ परीक्षार्थी गैरहजर होते. तर दुसऱ्या पेपरसाठी २,४२१ परीक्षार्थी हजर तर १,५१७ परीक्षार्थी गैरहजर होते.  शहरातील सर्व केंद्रावर शांततेत परीक्षा पार पडली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.