भारतात 24 तासात 46,951 नवे कोरोना रुग्ण

Share This News

नवी दिल्ली,  22 मार्च : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात आणि देशव्यापी कोरोना लसीकरणानंतर  गेल्या 24 तासात भारतात  46,951  नवे कोरोना रुग्ण आढळले असून 212  नागरिकांचा मृत्य झाला आहे. 21,180 नागरिक बरे झाले आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.

भारतात कोरोनाचे  1,16,46,081 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या  3,34,646 झाली आहे. 

एकूण 1,11,51,468  नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,59,967 आहे. आतापर्यंत देशात  4,50,65,998 नागरिकांचे लसीकरण झाले.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 8,80,655 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  23,44,45,774 चाचण्या घेण्यात आल्या.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.