सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत 5 जणांचा मृत्यू |5 killed in Serum Institute fire
पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. सीरमची आग आटोक्यात आल्यानंतर माहिती देताना मोहोळ म्हणाले की, इमारतीच्या सहाव्या मजल्यावर 5 जळालेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे महापौर मोहळ यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे देशासह जगाचे लक्ष पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागले आहे. यापार्श्वभूमीवर आज, गुरुवारी सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर दुपारी आग लागली. त्यानंतर ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास 4 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. गुरुवारी दुपारी सिरम इन्स्टिटयूट च्या नवीन इमारतीला आग लागली. या इमारतीमध्ये काम सुरु होते वेल्डिंगच् काम सुरु असताना आग लागली असल्याची शक्यता आहे. आग मोठी असल्याने १० अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. ज्या इमारतीला आग लागली त्या ठिकाणी बीसीजी लस बनवण्याची प्रयोगशाळा आहे. covid लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीमध्ये केलं जातं. ती इमारत सुरक्षित असल्याचं अग्निशमन दालनं सांगितलं