“कारवाई न करण्यासाठी 50 लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी 2 कोटी”; परमबीर सिंग अडचणीत

Share This News

मुंबई – परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशात गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृह सचिवांकडे तक्रार केल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये निलंबन न करण्यासाठी 50 लाख तर निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप अनुप डांगे यांनी केला आहे.अनुप डांगे यांनी 2 फेब्रुवारी रोजी याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. अनुप डांगे यांनी परमीबर सिंह यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या खळबळ उडाली आहे. यामुळे आता परमबीर सिंग अडचणी येण्याची शक्यता आहे.

गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर 22 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 रोजी कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान पबचा मालक जीतू नावलानी याने तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत ‘घरके रिलेशन है’ असे सांगून कारवाईस विरोध केला, असं अनुप डांगे यांनी सांगितलं आहे.या प्रकारानंतर 25 नोव्हेंबर रोजी एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंग यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा कॉल आला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगताच, तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भेटीला जाण्यास नकार दिला. त्याबाबत संबंधित एसीबी कार्यालयात कळवण्यात आलं. त्यानंतर परमबीर सिंग यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच, माझ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु झाली. पुढे 4 जुलै 2020 रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली. पाठोपाठ 18 जुलै रोजी माझे निलंबन झालं. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबवण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती. पुढे कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी केल्याचा आरोप अनुप पांडे यांनी केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.