पहिल्या टप्प्यात ५१ लाख लसीकरण

Share This News

नवी दिल्ली
देशात कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांना दिली जाणार आहे. यासाठी जवळपास एक हजार लसीकरणाचे केंद्र तयार केले जाणार आहेत. दिल्लीतील ४८ सरकारी आणि १00 खासगी रुग्णालयात ही केंद्र तयार केली जातील. लसीकरण केंद्रावर कोल्ड चेनची व्यवस्था असेल. यासोबतच प्रत्येक विभागातील क्लिनिक्समध्येही लसीकरण केंद्र तयार केले जातील. सध्या दिल्लीत लसीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. डझनभर खासगी रुग्णालयांमधील ६00 आरोग्य सेवा तज्ज्ञांसह ३५00 लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शासकीय लसीकरण कार्यक्रमाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या खासगी रुग्णालयांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे. ज्यांना लसी दिली जाणार आहेत. अशा लोकांना प्राधिकरणाकडून एसएमएसद्वारे माहिती मिळेल, ज्यामध्ये बूथ आणि वेळेचा उल्लेख असेल. लसीकरण कार्यक्रम, कोविड टास्क फोर्सचे सदस्य आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील कम्युनिटी मेडिसिनचे संचालक डॉ. सुनीला गर्ग यांनी सांगितले की, सर्व ५१ लाख लोकांचे लसीकरण मोफत केले जाईल. डॉ. गर्ग म्हणाले, सर्व बूथवर लसींची तपासणी सरकारी अधिकारी करतील.
शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बांधली जातील. ही प्रक्रिया सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू होईल. ३ हजार कर्मचार्‍यांसह लोकनायक रुग्णालयात कोल्ड चेन तयारी केली असून तेथे ५ लसीकरण केंद्रे असण्याची शक्यता आहे. काही मोठ्या खासगी रुग्णालयांमध्येही अनेक लसीकरण केंद्रे असतील. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ काळात प्रत्येक बूथवर सुमारे १00 लसींचे डोस दिले जातील. प्रत्येक बूथमध्ये ३ खोल्या असतील. यापैकी एकीकडे आधार कार्डसह इतर ओळखपत्रांवर आधारित पडताळणी असेल. दुसर्‍या क्रमांकावर लसीचे डोस दिले जातील आणि लस दिल्यानंतर तिसर्‍या खोलीत सुमारे अर्धा तास ठेवले जाईल. २८ दिवस परीक्षण केल्यानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.
कोविड -१९ लसीकरणातील पहिल्या टप्प्यात ३ लाख आरोग्यसेवा कर्मचारी, ६ लाख फ्रंटलाइन कामगार आणि ५0 वर्षापेक्षा जास्त वयाच्या किंवा इतर कोणत्याही गंभीर आजार असलेल्या २ लाख लोकांना लसी दिली जाईल. एका अधिकार्‍याने दिलेल्या महितीनुसार ज्याला आपले नाव नोंदणी करून घेण्याची आवश्यकता असेल त्याने जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकार्‍याशी संपर्क साधावा.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.