देशात 59 हजार 118 नवे कोरोनाग्रस्त

Share This News

नवी दिल्ली, 26 मार्च : देशात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे. गेल्या 24 तासात देशात तब्बल 59 हजार 118 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या 1 कोटी 18 लाख 46 हजार 652 झाली आहे.  यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात गेल्या 24 तासात 59 हजार 118 नवे रुग्ण आढळले असून 32 हजार 987 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 18 लाख 46 हजार 652 इतकी झाली असून 1 कोटी 12 लाख 64 हजार 637 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 21 हजार 66 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 60 हजार 949 इतकी आहे. देशात आतापर्यंत 5 कोटी 55 लाख 4 हजार 440 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.