नागपूर मेट्रोला बूस्ट,दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटींचा निधी मंजूर

Share This News

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला, या अर्थसंकल्पात राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी मोठी घोषणा केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी केली. यात नागपूर मेट्रोसाठी तब्बल ५ हजार ९७६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर नाशिक मेट्रो साठी २ हजार ९२ कोटींच्या निधीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हा निधी राहणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपूर मेट्रो प्रकल्प सुरु झाला. हा मेट्रो प्रकल्प इतर शहरणासाठी पथदर्शक असा प्रकल्प ठरला आहे. माझी मेट्रो हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरातील महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ८ हजार ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला आजच्या बजेट मध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल ५ हजार ९७६ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या आजच्या संसदेतील या घोषणेमुळे नागपूरच्या माझी मेट्रोला आता बूस्ट मिळाला आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.