प्रजासत्ताक दिना निमित्य ७ पद्मविभूषण, १0 पद्मभूषण आणि १0२ पद्मश्री पुरस्कार जाहीर

Share This News

नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात ७ पद्मविभूषण, १0 पद्मभूषण आणि १0२ पद्र्मशी पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधूताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या यादीत २९ महिला आहेत. तर १0 विदेशी नागरिकांनादेखील पुरस्कार दिला गेला आहे. १६ जणांना मरणोत्तर या पुरस्काराची घोषणा झाली आहे.
महाराष्ट्रातील सिंधूताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्याबद्दल, परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल, नामदेव कांबळे यांना साहित्यातील योगदानाबद्दल आणि जसवंतीबेन पोपट यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील उद्योजक रजनीकांत र्शॉफ यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रभोधन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अनाथांना आसरा देत अनाथांची माऊली अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्रीची घोषणा झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी आयुष्यभर सर्मपित वृत्तीने सामाजिक कार्य केले. पारधी समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांनी केलेले कार्य विलक्षण आहे. गिरीश प्रभुणे यांनादेखील पद्मश्रीची घोषणा झाली आहे. लिज्जत पापड उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देणार्‍या जसवंतीबेन पोपट यांनादेखील पद्मश्रीची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही पद्मविभूषण जाहीर झाला आहे. कला क्षेत्रात एस. पी. बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्त्वतज्ज्ञ बी. बी. लाल यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. एस.पी. बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण, तरुण गोगोई, केशुभाई पटेल तसेच रामविलास पासवान यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.