महाराष्ट्रात 24 तासात 74045 बाधित कोरोनामुक्त

Share This News

महाराष्ट्राला दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 66 हजार 836 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्याचवेळी एकाच दिवसात 74 हजार 45 इतक्या रुग्णांनी करोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असं पहिल्यांदाज घडलंय, जेव्हा नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात आज 773 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात करोनाचा उद्रेक कायम आहे. गेले काही दिवस सातत्याने 60 हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यात काल आणि आज मोठ्या संख्येने रुग्ण करोनामुक्त झाल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सात लाखांच्या आत ठेवण्यात यश आलं आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.