वर्धेत लागली ३६ तासांची संचारबंदी | A 36-hour curfew was imposed in Wardha
वर्धा शहर व ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने, रुग्णसंख्या नियंत्रणासाठी आणि कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता वर्धा शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात 36 तासाची संचारबंदी केली आहे. नागरिकांनी काळजी घेऊन अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. दरम्यान सर्व बाजारपेठ , मॉल्स, कॉम्प्लेक्स येथील सर्व दुकाने बंद राहतील. सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरेंट संचारबंदीच्या कालावधीत बंद राहतील. चहा,मिष्ठान प्रतिष्ठान, पानटपरी व इतर वस्तु विक्री, जिवनावश्यक व बिगर विनावश्यक वस्तूची दुकाने सुध्दा बंद राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खाजगी बसेस, खाजगी वाहतूक, एस. टी. बसेसची सेवा तसेच नगरपालीका हद्दीतील व जिल्हयातील ऑटो रिक्षा ची सेवा नागरिकांसाठी बंद राहील. वर्धा शहर व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोल, डिझेल पंप निर्देशाप्रमाणे बंद राहतील. असे निर्देश जारी करण्यात आले आहेत