बिबट्याच्या हल्ल्यात 40 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू
चंद्रपूर येथील वेस्टर्न कोल फिल्डच्या वसाहतीजवळील सिनाळा या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी, 16 फेब्रुवारी उघडकीस आली.
नरेश वामन सोनवणे असे वाघाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास चार ते पाच जण सिनाळा जंगलात परिसरात फिरायला गेले होते. तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने नरेशवर हल्ला करून त्यास ठार केले.
मंगळवारी गस्तीवर असलेल्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. वनविभाग व दुर्गापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. मृताच्या कुटुंबियांना तातडीची मदत देण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांनी दिली आहे.