अमरावती शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारावर मोरेगावत गुन्हा दाखल

Share This News

शिक्षकांना पैठणी साडीसह पैशाचे पाकिट भेट देणे पडले महागात, आदर्श आचारसंहिता पथकाची कारवाई

१ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मतदाराना आकर्षित करण्यासाठी पैठणी साडीसह पैशाचे पाकीटे वाटप करण्याचा कार्यक्रम एका उमेदवारांकडून सुरू असताना मारेगावच्या आदर्श आचारसंहिता पथकाने रंगेहाथ कारवाई करुन आचारसंहीता उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0१ डिसेंबरला अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत विजयीश्री खेचण्यासाठी उमेदवारांकडून प्रचार मोहीम जोरात सुरू असतानाच मात्र या मतदार संघाच्या उमेदवार किरण रामराव सरनाईक यांनी मतदारांच्या आकर्षणासाठी चक्क पैठणीसाडी व पैशाचे पाकीट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. निवडणुक दरम्यानच्या कालावधीत अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणे हे निवडणूकीणीच्या आदर्श आचार सहितेचे उल्लंघन करणारे असल्याने त्यांनी केलेल्या या क्रुत्याचे विरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात येवुन उमेदवार किरण सरनाईक यांचेसह त्यांच्या काही प्रचार कार्यकर्त्यावर मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये आचार सहिता उल्लंघन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याने राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे.
आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही या करिता निवडणूक विभागाचे मारेगाव पथक डोळ्यात अंजन घालुन कर्तव्यावर आहे. दिनांक २२ नोव्हेंबरचे सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान काही शिक्षकांना पैठणी साडी व पैशाचे पाकीट उमेदवाराकडून देण्यात येत असल्याची व्हायरल ऑडीओ क्लिप या पथका कडे प्राप्त झाली होती. त्याआधारे येथील निवडणूक आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख संदीप वाघमारे यांनी मारेगाव पोलिसात रीतसर तक्रार दाखल केलीअसुन,त्या तक्रारीच्या आधारे शिक्षक उमेदवार किरण रामराव सरनाईक वय ४५ राहणार वाशिम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काही शिक्षकाकडून पैठणी साडी व पॉकिट जप्त करण्याची प्रक्रिया उशिरापयर्ंत सुरू होती. अमरावती शिक्षक मतदारसंघात मारेगाव तालुक्यात एकुण १९२ मतदार आहे.
या मतदाराना आकर्षीत करण्यासाठी जवळपास सर्वच उमेदवारानी प्रचाराची आघाडी घेतली असतानाच मात्र किरण सरनाईक व इतर काही लोकांनी दिनांक २२ रोजी चार वाजताच्या दरम्यान मारेगाव शहरासह ग्रामीण भागातील शिक्षकांना पैठणी साडी व पैशाचे पाकीटाचे वाटप करुन विशेष प्रचार मोहीम राबविण्याची शक्कल लढवली होती. याबाबतची गोपनीय माहिती निवडणूक विभागाच्या पथकांना प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या पथकांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली असता यामध्ये वास्तविक स्थिती निदर्शनास आल्याने याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
पथकाने दिलेल्या तक्रारीचा आधार घेत मारेगाव पोलिसांनी लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असुन पुढील तपास मारेगाव चे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार करीत आहे.Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.