पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राची केली हत्या A friend killed his friend over a money dispute

Share This News

3 तासात आरोपी अटकेत
भंडारा- घेतलेले पैसे मित्र वारंवार मागत असल्याने याला कंटाळून मित्राचा खून केल्याची घटना आज भंडारा शहरात उघडकीस आली. म्हणजे अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपींना पकडून हत्तेचा छडा लावला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.खार रोड येथील नीलकंठ बाहे वय 50 हे रोज संध्याकाळी सहा वाजता फिरायला जात असत. बुधवारी 17 रोजी ते नियमित घराबाहेर पडले. मात्र घरी परत आले नाहीत. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान आज अठरा रोजी सकाळी भंडारा पवनी मार्गावरील दवडीपार येथे असलेल्या दर्ग्याच्या मागील कलव्या मध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना दिसला. कारधा पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. बाहे हे घरून बेपत्ता असल्याचे माहिती असल्याने त्यांच्या मुलाला बोलून ओळख पटविण्यात आली. मृतकाच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मार होता. दरम्यान मुलाने ओळख पटल्यानंतर मृतदेह हा नीलकंठ बाहे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुलाने संशयित व्यक्तीच्या नावे कारधा पोलीसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे खात रोडवरील फुलचंद बांते वय 48 यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरवातीला दिल्यानंतर अखेर बाहे यांचा खून केल्याचे बांते यांनी मान्य केले. दरम्यान पोलिसांनी बांते यांना हत्या करण्यासाठी मदत करणाऱ्या तेजराम धूर्वे वय 34 यांनाही ताब्यात घेतले. दोघांच्या विरोधात कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहे यांचा मृतदेह सापडताच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व कारध्याचे ठाणेदार दीपक वानखेडे यांनी गतीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या तीन तासात आरोपींना ताब्यात घेतले. बांते हे बाहे यांचे मित्र असून बाहेरचे एक लाख रुपये बांते यांच्याकडे होतील. पैसे मिळावे म्हणून वारंवार आहे मागणी करीत असल्याने हत्या केल्याची कबुली बांते यांनी पोलिसांना दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.