गोंदियात मृत वाघाचा कटलेला पाय सापडला; रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक A mutilated leg of a dead tiger was found in Gondia; Railway employees arrested

Share This News

गोंदिया : बल्लारशाह रेल्वे मार्गावरील पिंडकेपार-गोंगलेदरम्यान रेल्वेने दिलेल्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. ही घटना सोमवार, ८ मार्चला सकाळी उघडकीस आली होती. या घटनेनंतर वाघाचा कटलेला पाय गायब झाला होता. हा पाय रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांकडून जप्त करण्यात आला आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे.


पुरुषोत्तम काळसर्पे (रा. दांडेगाव/एकोडी) व हरीप्रसाद मीना (रा. गोंगले) ही अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ते रेल्वेत चाबीदार आहेत. रेल्वेने धडक दिल्यानंतर १२ त १५ महिन्याच्या या नर वाघाचा पाय तुटला होता. श्वान पथकांच्या मदतीने वन विभागाने पायाचा शोध सुरू केला. त्यावेळी हा पाय रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांकडे असल्याचे निष्पन्न झाले. ज्या लोहमार्गावर हा अपघात घडला ते गोरेगाव वनपरिक्षेत्राच्या पिंडकेपार मुंडीपार बिटमध्ये येते. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येते. त्यामुळे व्याघ्र मृत्यूच्या घटनेकडे गंभीरतेने पाहिले जात होते. वाघ रेल्वेच्या धडकेले मरण पावला त्यावेळी त्याचे दोन्ही पाय शाबूत असल्याचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाले होते. मात्र वन विभागाचे अधिकारी अपघातस्थळी पोहोचले त्यावेळी वाघाचा उजवा पाय कापलेला होता. अटक करण्यात आलेल्या दोन्ही रेल्वे कर्मचाऱ्यानी वाघाचा उजवा पाय कापून तो रेल्वे रुळाला लागूनच काही अंतरावर लपवून ठेवलेला होता.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.