४०० व्यक्तींचा सुसज्ज निवारा केंद्र उभारणार – पालकमंत्री बच्चू कडू A well-equipped shelter for 400 people will be set up – Guardian Minister Bachchu Kadu

Share This News

अकोला, दि. 13 –जिल्ह्यातील बेघर तसेच भिक्षेकरींसाठी 400 व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था असलेले सुसज्ज बेघर निवारा केंद्र उभारणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले. अकोट फैल येथील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आशा किरण महिला विकास संस्थाद्वारे संचालित संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्राला भेट दिली, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय पोलिस अधीक्षक सचिन कदम,  आशाकिरण महिला विकास संस्थेच्या दुर्गाताई भड, महानगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांची विशेष उपस्थिती होती.

शहरातील भिक्षेकरी व्यक्तींना निवारा मिळवून देण्यासाठी मनपा, जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्यवतीने येत्या सोमवार पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात असलेल्या 137 भिक्षेकरी व्यक्तींवर सामाजिक संस्थाच्या माध्यमातून समुपदेशन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येणार आहे. या प्रत्येक व्यक्तीचा केस स्टडी पेपर तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिल्या.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.