अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली; एफडीए आयुक्तपदी परिमल सिंह

Share This News

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्तरदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात अपयश आल्याच्या कारणावरून ही बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनवरून सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असे युद्ध रंगल्याचे चित्र आहे. दरम्यानच्या काळात ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला विलेपार्ले पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी धाव घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. त्यातच एफडीए आयु्क्त काळे यांनी दिलेल्या पत्रामुळे देखील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नाराज होते. काळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानंतर काळे यांची बदली करण्यात आली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.