अंबरनाथ – बदलापूर दरम्यान खडी टाकणारी मशीन घसरून अपघात; एका कामगाराचा मृत्यू Accident due to sliding machine during Badlapur; Death of a worker

Share This News

ठाणे ” अंबरनाथ – बदलापूर दरम्यान खडी टाकणारी मशीन घसरून पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी आहेत. जखमींना कल्याण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे अंबरनाथ – बदलापूर दरम्यानची डाऊनच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बदलापूरहून पहिली गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. 
 मिळालेल्या माहितीनुसार, रात्री २ ते पहाटे ५ या वेळेत या मार्गावर काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. त्याच वेळी पहाटे खडी टाकणारी मशीन घसरून अपघात झाला. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.