चाकू घेऊन फिरत असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्र. ३ च्या पथकाचा ताब्यात

Share This News

नागपूर : हातात एक मोठा स्टिलचा चाकू घेऊन फिरत असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्र. ३ च्या पथकाने ताब्यात घेतले. सुकेश सिध्दार्थ ढेंगरे, असे आरोपीचे नाव आहे. तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या बेतात फिरत असल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ चे पथक २५ जानेवारीला रात्री ७ वाजताच्या सुमारास गुन्हेगाराच्या शोधार्थ पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान तुकडोजी पुतळा चौकात सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास एक जण प्राणघातक शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. सुकेश सिध्दार्थ ढेंगरे (३0) रा. न्यू कैलासनगर, अजनी, हा स्प्लेंडरवरील नंबर प्लेटवरील मागील आणि समोरील आकडे पेंटने मिटवून फिरत होता. पोलिसांनी त्याला न्यू कैलासनगरच्या गल्ली नं.0८ येथून ताब्यात घेतले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.