पत्नीच्या मैत्रिणीवर अतिप्रसंग करणारा आरोपी गजाआड़
शहरातील गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीत अतिप्रसंगाचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे. पीडित युवती ही राजस्थान येथील जयपूर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, तिच्या मैत्रिणीच्या नवर्यानेच तिच्यावर बळजबरी केलि आहे , मिळालेल्या माहितीनुसार पीडिता ही २३ वर्षांची आहे. ती नागपूर शहरातील तिच्या मैत्रिणीकडे आली होती. सोमवारी आणि मंगळवार रात्री च्या दरम्यान, तिच्या मैत्रिणीचा नवरा जुनेद खान याने संधी बघत त्याचे मित्र जरीन आणि सोनू याच्या मदतीने पीडितेवर अतिप्रसंग केला. घटनेसंदर्भात कुणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या पीडितेने तिच्या मैत्रिणीला माहिती दिली. घटनेनंतर पीडितेवर तक्रार न करण्याचा दबाव टाकण्यात आला होता. परंतु, हिंमत करून या पीडितेने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे