“योगी सरकारविरोधात खोटं बोलण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला ५० लाखांची ऑफर”

Share This News

देशद्रोह आणि षडयंत्र रचल्याचा आरोप…

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून १९ एफआयर दाखल करण्यात आले आहेत. यामधील एक एफआयआर अज्ञातांविरोधात असून देशद्रोह आणि षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. पीडितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर तिच्या कुटुंबाला राज्य सरकारविरोधात खोटं बोलण्यासाठी ५० लाखांची ऑफर देण्यात आली होती असाही आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आलेला आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, “राज्य सरकारविरोधात खोटं बोलण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला काही घटकांकडून ५० लाखांची ऑफर देण्यात आली”. एफआयआरमध्ये हे घटक म्हणजे नेमके कोण आहेत याबद्दल कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. याशिवाय उत्तर प्रदेशात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

एफआयआरमध्ये सांगण्यात आलं आहे की, एका अज्ञात पत्रकाराने पीडितेच्या भावाला आई-वडिलांचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन आपण राज्य सरकारवर समाधानी नसल्याचं सांगण्यास भाग पाडलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातील खोटी विधानं सोशल मीडियावर व्हायरल करत सरकारची बदनामी करण्याचं षडयंत्र रचण्यात आल्याचाही आरोप एफआयआरमध्ये आहे.

हाथरस प्रकऱणी एकूण १९ एफआयआऱ दाखल करण्यात आले आहेत. हाथरस प्रकरण हाताळण्यावरुन टीका होत असताना पोलिसांनी राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या प्रगतीविरोधात नाराज असणारे प्रकरणाला वेगळं वळण देत असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केल्यानंतर या केसेस दाखल करण्यात आल्या. एफआयआरसंबंधी बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी, “हाथरस घटनेमागे मोठं षडयंत्र असून आम्ही सत्याचा तपास करु,” असं म्हटलं आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.