मीड डे पत्रकार हत्या प्रकरणातील आरोपीस पॅरोल

Share This News

नागपूर : मुंबई येथून प्रकाशित होणार्‍या मीड डे या वृत्तपत्रातील कार्यरत पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी अनिल भानूदास वाघमोडे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४५ दिवसांसाठी अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली. आरोपी वाघमोडे हा छोटा राजन गॅंगचा सभासद आहे. त्याने २0११ ला छोटा राजन याच्या सोबत मिळून मुंबंई येथे हत्या केली होती. ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनसह इतर १६ आरोपींना दोषी ठरवत शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानुसार अनिल वाघमोडे नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घारोटे यांच्या खंडपीठाने त्याला नियम व अटीवर पॅरोल मंजूर केला. याचिकाकर्त्या कैद्यातर्फे अँड. अरविंदकुमार शर्मा यांनी कामकाज पाहिले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.