वर्षाअखेर रेती माफियांविरुध्द धडक कारवाई

Share This News

चंद्रपूर
वर्षाअखेर रेती माफियांविरुध्द धडक कारवाई करीत सावली पोलिसांनी पेडगाव मार्गे शेतशिवारा लगत रोडवर ५ रेतीने भरलेले ट्रॅक्टर पकडण्यात आले.
महाराष्ट्रसह जिल्ह्यातील रेती घाटाची लिलाव प्रक्रिया बंद असताना, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील साखरी घाटावरून सर्रास चोरटी रेती चोरीचा धुमाकूळ सुरू होता. याकडे स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्व दुर्लक्ष होत होते. दरम्यानच्या काळात कोरोना विषाणू संसर्ग लॉंकडाऊन, दिवाळी, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक या काळात सारेच प्रशासकीय अधिकारी व्यस्त असताना रेती माफिय सक्रिया झाले होते. त्यामुळे साखरी घाटावरून दिवसागणिक रेती चोरीत वाढ होत होती. पहाटे ३ वाजतापासून वैनगंगेच्या साखरी घाटावरून चोरटी रेतीचा सर्रास धुमाकुळ सुरू होता.

सावली पोलिस जिबगावमार्गे पेडगाव साखरी मार्गात पेट्रोलींग करीत असताना पेडगाव मार्गे शेतशिवारा लगत रोडवर ५ रेतीने भरलेले ट्रॅक्टर पकडण्यात येऊन त्यावर कारवाई करण्यात आली त्यामध्ये ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ बी आर ४६७९ चालक प्रवीण गणपत पाल, (मालक प्रशांत ईंचवार,सावली), ट्रॅक्टर एम.एच. ३४ क्र.बी.आर. ५३२0 चालक योगेश दिलीप मेर्शाम चकपिरंजी,(मालक प्रशांत राईंचवार,) ट्रक्टर क्र. एम एच ३४ बी एफ ९६७६ चालक रंजीत बंडू कलसार (मालक सचिन संगीडवार,) एम एच ३४ एल ६00९ चालक शंकर शरद मडकाम सावली,(मालक सचिन संगीडवार) ट्रॅक्टर एम. एच. ३४ बि आर २२७४ चालक राकेश नेताजी वर्दलवार (मालक तुषार धोटे)अशा बिना टिपी बिना परवाना ट्रॅक्टरवर जप्ती करून सदर कारवाईसाठी महसूल विभाग सावली यांच्याकडे हस्तांतरण करण्यात आले. सुरक्षतेच्या दृष्टीने ताब्यात घेण्यात आले होते. नंतर ते महसुली विभागाला हस्तांतरण करण्यात आले. पेट्रोलिंग करताना ठाणेदार राठोड साहेब, स. फौ. बोलीवार, दीपक डोंगरे, चव्हाण आदी उपस्थित होते. सोबतच पोलिस विभागाने जप्ती केलेल्या ट्रॅक्टरचे महसूल विभागाला हस्तांतरण केल्यानंतर महसूल विभाग या बिना टिपी बिना परवाना ५ अवैध रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर काय कारवाई करते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.