२३७५ वाहन चालकांवर कारवाई
नागपूर : वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली २३७५ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ५,६८,८५0 रु. दंड वसूल करण्यात आला. मुंबई दारूबंदी कायद्यान्वये ७ प्रकरणात ८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८,५४८ रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये १0 प्रकरणात ११ जुगार्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३७,८५६ रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.