विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्यास शाळांवर कारवाई Action on schools if students are deprived of exams

Share This News

नागपूर : विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शुल्क भरण्यासाठी शाळा पालकांना तगादा लावण्यात येत आहे. शुल्क न भरल्यास मुलांना परीक्षेला बसू देणार नाही, ऑनलाईन वर्ग बंद करण्यात येतील, अशी शाळांकडून पालकांना धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये, असे निवेदन शिक्षक उपसंचालकांना पालक संघटनांनी दिले होते. त्यावर कारवाई करीत विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्यास शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना शिक्षक उपसंचालकांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्यास तसेच त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्यास मुख्याध्यापक यांना व्यक्तिश: जवाबदार धरून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, याची शाळांना सूचना देण्यात यावी, असे यावेळी शिक्षक उपसंचालक वैशाली जामदार यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.