चंद्रपूर : कोरोना टेस्टिंगसाठी अधिक शुल्क आकारल्यास होणार कारवाई
कोरोना तपासणीकरिता जिलतील जे खासगी अँन्टिजन टेस्टिंग सेंटर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक दर आकारत असल्याचे आढळून आल्यास त्या खाजगी अँन्टिजन टेस्टिंग सेंटरचा परवाना रद्द करून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक नवृत्ती राठोड यांनी दिल्या आहेत.
आयुवैज्ञानिक संस्था तथा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार जिल्हय़ातील शासकीय तथा महानगरपालिका स्तरावर कोविड-१९ आजाराची अँन्टिजन टेस्टिंगकरिता अँन्टिजन टेस्टिंग सेंटर व आर.टी.पी.सी.आर. टेस्टिंग सेंटर असे एकूण २७ ठिकाणी नि:शुल्क केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही. तसेच जिलत एकुण १७ खाजगी अँन्टीजन टेस्टींग सेंटर कार्यरत असून त्यांचेकरिता शासनाने अँन्टीजन टेस्टींग शुल्क जास्तीत जास्त रू. ८00 ठरवून दिलेला आहे. यापेक्षा जास्त शुल्क कोणत्याही खाजगी अँन्टीजन टेस्टींग सेंटर च्या व्यवसायीकांना आकारता येत नाही. कोणत्याही सेंटरने ८00 रु. पेक्षा जास्त चाचणी शुल्क आकारल्यास या बाबतची माहिती तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोना नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. 0७१७२-२७0६६९ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.
खाजगी अँन्टिजन टेस्टिंग सेंटरच्या इन्फ्लुएन्झा (ताप) सद्रुष्य लक्षणे असल्यास व अँन्टिजन टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांचे नमुने हे आर.टी.पी.सी.आर. करिता पाठविणे आनिवार्य असल्यामुळे खासगी अँन्टिजन टेस्टिंग सेंटर असे नमुने शासकीय व्ही.डी.आर.एल. लॅब, शासकीय वैद्यकीय महाविद्यलाय, चंद्रपूर येथे पाठवितात. या नमुन्यांकरिता शासनातर्फे कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नाही. तथापि काही खाजगी अँन्टिजन टेस्टिंग सेंटर हे आर.टी.पी.सी.आर. टेस्टकरितादेखील परस्पर अँन्टिजन टेस्टिंगचे सेवाशुल्क ८00 रु. घेतल्यावरसुध्दा अतिरीक्त सेवाशुल्क आकारत आहे. ही बाब अत्यंत खेदाची आहे. अशा प्रकारच्या घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोना नियंत्रण कक्षाला तक्रार नोंदवावी.
सद्या जिल्हयात संस्था डॉ. अतुल चिद्दरवार पॅथेलॉजी लॅब व डॉ. संगई पॅथेलॉजी लॅब या दोन खासगी संस्थेना आर.टी.पी.सी.आर. स्वॉब कलेक्शन सेंटर साठी जिल्हा स्तरावरून परवानगी देण्यात आलेली आहे व अशा संस्थेला सुध्दा रु. १८00 पेक्षा जास्त सेवा शुल्क आकारता येत असल्याचे डॉ. राठोड यांनी कळविले आहे.