प्रभासच्या चाहत्यांसाठी पर्वणी, चित्रपटगृहात पुन्हा एकदा ‘बाहुबली’ अवतरणार!

Share This News

actor-prabhas-starrer-baahubali-all-set-to-release-once-again-in-cinema

सुपरडुपर हिट ठरलेल्या ‘बाहुबली’ला पुन्हा एकदा पडद्यावर बघणे ही प्रभासच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

मुंबई : कोरोन काळात बंद असलेली चित्रपटगृहे आता ‘अनलॉक’ प्रक्रियेत पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांना पुन्हा चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी काही जुने ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत. यात प्रेक्षकांच्या लाडक्या  प्रभासचा (Actor Prabhas) ‘बाहुबली’ (Baahubali) या चित्रपटाचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ दोन्ही चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहेत. (Actor Prabhas starrer Baahubali all set to release once again in cinema)

सुपरडुपर हिट ठरलेल्या ‘बाहुबली’ला पुन्हा एकदा पडद्यावर बघणे ही प्रभासच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, येत्या शुक्रवारी (6 नोव्हेंबर) ‘बाहुबली’ प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर, पुढच्या शुक्रवारी (13 नोव्हेंबर) ‘बाहुबली 2’ प्रदर्शित होऊ शकतो. एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या चित्रपटात प्रभाससह अभिनेत्री तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, राम्या कृष्णन, अभिनेता राणा दग्गुबाती, सत्याराज यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

अध्या सणांचा हंगाम सुरू होत असल्याने, आर्थिक दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. दिवाळीपूर्वी प्रभासचा चित्रपट प्रदर्शित झाल्यास, दिवाळीच्या काळात लोकांचे पाय आपोआप चित्रपटगृहांकडे वळतील, असे म्हटले जात आहे. (Actor Prabhas starrer Baahubali all set to release once again in cinema)

कोरोना काळात ठप्प झालेले व्यवहार आता सुरळीत होऊ लागले आहेत. अनलॉक नियमानुसार आता चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करून प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाता येणार आहे. परंतु, काही राज्यांमध्ये अद्याप या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली नाही. फिल्म थिएटर असोशिएशनने यासंदर्भात निर्णय घेतले आहेत.

नव्या चित्रपटांना नुकसानीची भीती

प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकणार आहेत. मात्र, त्यासाठीचे नियम अत्यंत कठोर असल्याने, अशा परिस्थितीत कोणत्याही निर्मात्याला आपला नवीन चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा नाही. प्रेक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणून ते अधिक चांगल्या किंमतीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे हक्क वितरीत करून, नवे चित्रपट प्रदर्शित करत आहेत.

प्रभासला वाढदिवसाची भेट!

‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अवघ्या मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध झालेला ‘डार्लिंग प्रभास’ने 23 ऑक्टोबर रोजी आपला 41वा वाढदिवस साजरा केला. 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नईमध्ये प्रभासचा जन्म झाला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रभासच्या नावाचा डंका होताच मात्र, ‘बाहुबली’मुळे तो बॉलिवूडमध्ये नावाजला जाऊ लागला. प्रभासच्या त्याचा गाजलेला ‘बाहुबली’ हा चित्रपट अमेरिकेत पुन्हा प्रदर्शित केला गेला होता. आता तो भारतातही पुन्हा प्रदर्शित होणार असल्याने, प्रभासच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.