पाच महिन्यांनंतर अखेर ‘एमबीए’ प्रवेशाला सुरुवात

Share This News

राज्यातील पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमात (एमबीए) प्रवेशासाठी राज्य सामाईक परीक्षा विभागातर्फे (सीईटी सेल) १४ आणि १५ मार्चला घेण्यात आलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल २३ जूनला जाहीर होऊनही प्रवेशप्रक्रिया रखडली होती. अखेर आता पाच महिन्यांनंतर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी कक्षाद्वारे प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून १४ डिसेंबपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

एमबीए अभ्यासक्रमासाठी राज्याच्या सीईटी सेलमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. राज्यात एमबीएच्या ३७ हजार ३७४  जागा आहेत. निकालानंतर काही दिवसांतच प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाविद्यालयीन परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षा खोळंबल्या. त्यामुळे एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राबवण्यात येणारी प्रक्रियाही लांबली. मात्र, अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यानुसार १४ डिसेंबपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यात खुला आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी १ हजार, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० तर एनआरआय विद्यार्थ्यांसाठी ५ हजार रुपये अर्ज नोंदणी शुल्क असेल. १६ डिसेंबरला तात्पूरती गुणवत्ता यादी तर २० डिसेंबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित होऊन २१ पासून कॅप राऊंडला सुरुवात होईल. ३ जानेवारीपासून विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू होणार आहेत.

वेळापत्रक

*   ८ ते १४ डिसेंबर – अर्ज नोंदणी

*  १६ डिसेंबर – तात्पूरती गुणवत्ता यादी

*  २० डिसेंबर – अंतिम गुणवत्ता यादी

*  २१ ते २३ डिसेंबर – प्रथम फेरी

*  २६ डिसेंबर – विद्यार्थ्यांना प्रवेशाचे अलॉटमेंट

*  २७ ते २९ डिसेंबर – प्रवेश स्वीकृतीकरिता प्रवेश नोंदवणे

*  ३१ डिसेंबर ते १ जानेवारी – दुसऱ्या फेरीसाठी पर्याय नोंदवणे

*  ४ ते ७ जानेवारी – दुसऱ्या फेरीचे अलॉटमेंट व प्रवेश देणे

*  ८ ते १२ जानेवारी – महाविद्यालयातील रिक्त जागांची माहिती देणे

*  १४ जानेवारी – प्रवेशाची अंतिम तारीख

*  १५ जानेवारी -ऑनलाइन प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.