परभणीत बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्या नंतर आता नागपुरातही

Share This News

देशात ४ ते ५ राज्यात बर्ड फ्ल्यूने पाय पसरल्यावर राज्यातही बर्ड फ्ल्यू ने शिरकाव केला आहे. परभणी जिल्ह्यात कोंबड्याचा बर्ड फ्ल्यू मुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यू ची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरातील रिंगणाबोंडी, मिनीवाडा, मसाळा, चाकडोह, आंगेवाडा शिवारात काही दिवसांपासून पक्ष्यांच्या अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत पक्ष्यांमध्ये पाेपट, चिमणी, कावळा व जंगली कबुतरांचा समावेश असून शनिवारी सकाळी रिंगणाबाेडी शिवारातील झाडाखाली मृत पाेपटांचा सडा पडला हाेता. तिकडे अमरावतीच्या बडनेरा भागातही दोन दिवसांत २८ कोंबड्या दगावल्याने भीती निर्माण झाली आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत मृत कोंबड्यांचे स्वॅब अमरावतीच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव झाल्यावर त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना व खबरदरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.