ऑफलाइन परीक्षेच्या विरोधात नागपुरात आंदोलन

Share This News

नागपूर : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केल्यानंतर दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षेला विरोध होत आहे. त्यानुसार नागपुरातील रेशीमबाग परिसरात बारावीच्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात निदर्शने केली.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. अशात शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप करीत अनेकांनी नागपुरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आलीत. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाइन करण्यात आले आहे. अशात ऑफलाइन परीक्षेचा हट्ट का, असा सवाल विद्यार्थी व पालक उपस्थित करू लागले आहे.
परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने परीक्षांसदर्भात पुन्हा विचार करावा, अशी मागणीही विद्यार्थी व पालकांनी केली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या विभागाच्या कॅबिनेट मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संवाद साधावा अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.