अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील भिषण अपघातात पाच जण जागीच ठार

Share This News

अहमदनगर,दि.22 – नेवासा तालूक्यातील नगर – औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाट्यानजिक झालेल्या स्विप्ट कार व ट्रॅव्हल्सच्या  भिषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाल्याची दुर्दवी घटना घडली.हा अपघात इतका भिषण होता की,या अपघातात स्विप्ट कार चक्काचुर झाली आहे. हा अपघात सोमवार (दि.२२) रोजी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान घडला.
या अपघाताबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की  सोमवारी दि २२ रोजी रात्री २ च्या सुमारास अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस (क्रमांक एमएच १९ वाय ७१२३) व औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या स्विप्ट कार(क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ धडक झाली.या  भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहे.मृतक जालना जिल्ह्यातील मंठा येथील असल्याचे समजते. स्वीप्ट कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस शिरल्याने स्वीप्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पोलिस नाईक अशोक नागरगोजे,पोलीस नाईक बबन तमनर,पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलवले.पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.