वरपक्षा विरोधात वधु पक्षाकडून पोलिसांत तक्रार | A complaint was lodged with the police by the bride against the groom

Share This News

नागपूर : वधुकडील मंडळींची परवानगी न घेता परस्पर विवाह पत्रिका छापून लग्न लावण्यात आल्याप्रकरणी एका दाम्पत्याने वरपक्षाच्या विरोधात अजनी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
न्यु सुभेदार ले-आऊट भागातील सुधीर पांडुरंग वानकर व तारा वानकर यांच्यासह त्यांचा मुलगा लिलाधर यांच्याविरोधात ही तक्रार देण्यात आली आहे. पीडित पालकांनी आपल्या मुलीला फसवून लिलाधरने २० ऑगस्ट २०२० मध्ये तिच्याशी प्रेम विवाह केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार मुलीच्या परिवाराला कळल्यानंतर त्यांनी मुलाच्या नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानुसार दोघांचा विवाह करण्याचे ठरविण्यात आले. १३ जानेवारी २०२१ ला रीति रिवाजाने लग्न लागले. परंतु वानकर परिवाराने वधुपक्षातील मंडळींना विश्वासात न घेता पुन्हाँ एक़दा परस्पर लग्न पत्रिका छापल्या. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी हळद आणि २४ फेब्रुवारीला विवाह सोहळा असल्याचे पत्रिकेवर नमूद करण्यात आले. परंतु या पत्रिका छापताना व विवाह आयोजित करताना वरपक्षाने विश्वासातच न घेतल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली आहे. हल्दी च्या दिवशी २०० पाहुणे नाचताना असलेला वीडेओ समोर आला.
क़ोरोना कालामधे इतका मोठा कार्यक्रम करण्यची काय आवश्यकता? या सोहळ्यावर आपला आक्षेप असल्याचे नमूद करीत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.