अक्कड बक्कड बम्बे बो, डिजल नब्बे, पेट्रोल सौ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या अनेक मिम्स

Share This News

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून इंधन आणि गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशात डिझेल ९० रुपये तर पेट्रोल शंभरीपर्यंत पोहोचल्याने व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आदी सोशल माध्यमांवर सरकारविरोधातील मिम्स व्हायरल झाले आहेत. विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारीच नव्हे तर सामान्य नागरिकांनीही या मिम्सचे ‘फॉरवर्डींग’ सुरू केले आहे. इंधनासोबत गॅस सिलिंडरचे दरही वाढल्याने सध्या सोशल माध्यमांवर केवळ महागाईचीच चर्चा सुरू आहे.
इंधनाचे दर वाढल्याचा फायदा घेत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलने अनेक मिम्स तयार करून व्हायरल केले आहेत. तर या मिम्सला भाजपच्या सोशल मीडिया सेलनेही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे. देशातील सर्वांत महागडे पेट्रोल नागपुरात मिळत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी नागपूरवर लक्ष केंद्रीत केले आहे. इंधन महाग करून मोदी सरकार यांनी अच्छे दिन कसे आणले यासंदर्भातील अनेक कार्टुन, व्हिडीओ क्लिप तयार करून सोशल माध्यमांवर पोस्ट करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात असलेल्या राज्य सरकारच्या कर प्रणालीमुळेचे इंधन कसे महाग दिसत आहे, यासंदर्भातील पोस्टही सोशल माध्यमांवर दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारचे कर हटविल्यास इंधन बरेच स्वत होईल, अशा कमेंट्सही या पोस्टखाली वाचायला मिळत आहेत. गेल्या आठवडाभरापासून #PetrolDieselPriceHike हा हॅशटॅग मोदी विरोधकांनी सोशल माध्यमांवर चालविला आहे. तर केंद्र सरकाच्या समर्थनार्थही काही ट्रेण्ड सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. मात्र सामान्यांच्या खिशाला इंधन व गॅस सिलिंडर दरवाढीची झळ बसत असल्याने केंद्र सरकारविरोधात असलेला ट्रेण्ड तब्बत २५ हजार पोस्टमुळे सोशल मीडिया जगतात तिसऱ्या क्रमांकावर होता.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.