अकोला पोलिसांची कारवाई; रोड रोलरखाली सायलेन्सर चिरडले

Share This News

अकोला : बुलेटचा सायलन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या अकोल्यातील बाईक चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने 45 सायलेन्सर रोडरोलर खाली चिरडण्यात आले. त्यामुळे गोंगाट करणाऱ्या बुलेट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. रोडरोलरखाली सायलेन्सर चिरडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
अकोल्याचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या नेतृत्त्वात अकोला शहर वाहतूक पोलिस शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. अकोल्यात बुलेटचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले आहेत. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशा बाइक चालकांवर कारवाई सुरू केली आहे. या बाइक्सचे सायलन्सरही काढण्यात आले. त्यानंतर ते रोडरोलर खाली नष्ट करण्यात आले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.