रुग्णवाहिकेने आवश्यकता नसताना सायरन वाजवल्यास कारवाई – जिल्हाधिकारी

Share This News

नाशिक, ९ नोव्हेंबर, (हिं.स) : रुग्णवाहिका चालकांनी आवश्यकता असल्यास सायरन वाजवावा. विनाकारण सायरन वाजवत रुग्णवाहिका चालविल्यास सबंधित चालक व रुग्णालयाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. त्या अनुषंगाने रुग्णालय व सबंधित अस्थापनांना त्यांनी पत्र जारी करुन नियमाचे पालन व्हावे असे आदेश दिले आहेत.
रुग्णांना तत्काळ उपचार सेवा मिळावी यासाठी रुग्ण वाहतूक करणार्‍या रुग्णवाहिका वाहनांना लाल दिवा व सायरन्सची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. वर्दळीच्या ठिकाणी सायरनमुळे तत्काळ रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन दिला जातो. मात्र, काही रुग्णवाहिका चालक रस्त्यावर आवश्यकता नसताना सायरनचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा त्रास रस्त्यावरील वाहनचालकांना होतो व सायरनमुळे ध्वनि प्रदूषणातही भर पडते.
जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सूरज मांढरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत रुग्णवाहिकांसाठी नियमांचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानूसार रुग्णवाहिका चालकांनी आवश्यकतेनूसारच सायरनचा वापर करावा. रस्त्यावर गर्दी नसताना सायरनचा अनावश्यक वापर टाळून ध्वनि प्रदूषन टाळावे. रुग्णवाहिका रिकामी असल्यास तातडीच्या काॅल्सशिवाय सायरनचा वापर करु नये. सायरन सुविधेचा गैरवापर करु नये. सबंधित रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णवाहिका चालकांना या नियमांची माहिती द्यावी. जर वरील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास सबंधित रुग्णालय व रुग्णवाहिका चालकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्या भंग प्रकरणी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.