अमिताभ,अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शूटिंग करू देणार नाही; नाना पटोले यांचा इशारा

Share This News

काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन टिवटिव करणारे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार आता गप्प का? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ, अक्षय यांना महाराष्ट्रात शुटिंग करू देणार नाही, असा थेट इशारा दिला आहे.

नाना पटोले कांग्रेस प्रदेश अध्यक्ष झाल्या नंतर प्रथमच भंडारा जिल्ह्यात आगमना प्रसंगी कांग्रेस कार्यकत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. फटाक्यांची आतिशबाजी सह फुलांचा वर्षाव करण्यात आलातर दिल्ली येथिल शेतकरी आन्दोलनाच्या समर्थनात आज नाना पटोले यांच्या नेतृत्वात लाखनी ते भंडारा ट्रैक्टर मार्च सह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या जुन्या ट्विट्सचा संदर्भ देत नाना पटोले यांनी दोन्ही कलाकारांवर सडकून टीका केली. “काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन सारखी टिवटिव करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आता पेट्रोलची दरवाढ दिसत नाही का? त्यावेळी ६० रुपये पेट्रोलची किंमत असताना हे सेलिब्रिटी शंख करत होते. मग आता पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. अशावेळी हे सेलिब्रिटी शांत का? केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून हे चिडीचूप झालेत का?” अशा प्रश्नांची सरबत्ती करत नाना पटोले यांनी अमिताभ आणि अक्षय यांच्यावर टीका केली. यासोबतच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची आज पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे परवड होत असताना अमिताभ व अक्षय यांची चुप्पी योग्य नाही. त्यांना महाराष्ट्रात शूटिंग करण्याचा अधिकार नाही. त्यांचं जिथं कुठं शूटिंग सुरू असेल तर बंद पाडण्याची व्यवस्था आम्ही करू, असा थेट इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे. यावेळी मात्र सर्वत्र सोशल डिस्टनसिंग चा फज्ज़ा उडाला होता. नाना पटोले यांच्यासह कार्यकर्ते यांना मास्क घालण्यास विसर पडलाचे चित्र दिसत होते. आधीच भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना वाढिचे संकेत देत गर्दी टाळन्यासाठी जिल्ह्यातील महाशिवरात्रिच्या यात्रा व शिवजयंती यात्रा रद्द करण्याचा आदेश देण्यात आला होता हे विशेष.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.