अमरावती : वाढीव वीज बिल विरोधात भाजपाचे जिल्हाभरात ‘ताला ठोको’ आंदोलन

Share This News

अमरावती, ५ फेब्रुवारी वाढून आलेल्या भरमसाठ वीज बिलाच्या विरोधात आज भाजपच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करीत राज्य शासनाचा निषेध केला अमरावती शहरात बहुतांश वीज केंद्रावर हे ” ताला ठोको ”आंदोलन करण्यात आले.अमरावतीतील बडनेरा नवीवस्तीत महावितरणच्या कार्यलयाला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले. महावितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवास्तव विज बिल दिले. त्यानंतर वीज बिल माफी देऊ,वीजबिल सूट देऊ पासून १०० युनिट पर्यंत मोफत वीज देऊ अश्या सवंग व खोट्या घोषणा केल्या.त्यामुळे ग्राहक सवलत मिळण्यासाठी वाट पाहू लागले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेत रोष असल्याने भाजपणे महावितरण कार्यालयांना कुलूप लावून हल्लाबोल आंदोलन केले. 

काँग्रेसकडे असणाऱ्या ऊर्जा खात्याचे मंत्री नीतीन राऊत यांनी वीज बिल माफ करणे,१००युनिट विद्युत मोफत देणे ही माझी जबाबदारी नाही, ती जबाबदारी मंत्री मंडळाची आहे.मुख्यमंत्री यावर योग्य तो निर्णय घेऊ शकतात अशी फेकफेकी केली. महाविकास आघाडीच्या खिचडी सरकार मधील गोंधळलेल्या मंत्र्यांमुळे विद्युत ग्राहकांना व जनतेला नाहक मनस्ताप होत आहे. यावेळी भाजपा प्रदेश सदस्य जयंत डेहणकर, नगरसेविका गंगाताई अंभोरे, बडनेरा मंडल अध्यक्ष डॉ. वीरेंद्र ढोबळे, किशोर जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.मोर्शी मध्ये डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेण्यात आले  या वेळी राज्य शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला डॉ. बोंडे यांनी चाबकाने मारून आंदोलनाला सुरुवात केली. वीज वितरण कार्यालयावर या वेळी भाजप कार्यकर्त्यानी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ठिय्या आंदोलन पुकारले जो पर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत येथून हटणार नाही या सोबतच रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण पसरले होतेअमरावती शहरात आमदार प्रवीण पोटे पाटील ,शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात कॅम्प येथील सहायक अभियंता कार्यालयावर ताला ठोको आंदोलन करण्यात करण्यात आले यावेळी भाजप नगरसेवक हि उपस्थित होते.तिवसा येथे भाजपच्या ग्रामीण अध्यक्षा निवेदिता चौधरी [ दिघडे ] यांच्या नेतृत्वात वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला तर धामणगाव रेल्वे, अचलपूर, परतवाडा, धारणी या ठिकाणीहि आंदोलन करण्यात आले. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.