अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेश व्दार आज बंद; नागरिकांची झाली गैरसोय

Share This News

अमरावती, ३ फेब्रुवारी एका मुख्य आयुक्तांच्या फक्त एका प्रशासकीय बैठकीसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची दारे सर्व सामान्यांनसाठी आज अचानक बंद ठेवण्यात आली.त्यामुळे कामानिमित्य येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाल्याचं दिसून आलं. 
बुधवारी राज्याचे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांची विभागीय बैठक जिल्हाधिकारि कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती.परंतु ही बैठक चार भिंतीच्या आतमध्ये घेण्यात आली.यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामानिमित्य येणारे नागरिक यांची प्रचंड गैरसोय झाल्याचं दिसून आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व मुख्य प्रवेश दरवाजे यावेळी कुलूप बंद करण्यात आले होते.सकाळी कार्यालयात येणारे कर्मचारी आणि नागरिक प्रवेश गेट बंद असल्यामुळे परत जाताना दिसून आले.काही नागरिक गेट उघडण्याची वाट पाहत बसलेले होते.जिल्ह्धिकारी कार्यालय परिसरात असलेले सर्व सहा ही प्रवेश व्दार बंद करण्यात आले यावेळी कोणतीही सूचना किंवा कोणत्याच प्रकारची माहिती यावेळी सामान्य नागरिक जे कामानिमित्य जिल्हाधिकारी कार्यालयात येत होते त्यांना देण्यात येत नव्हती त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नेमके झाले तरी काय असा प्रश्न सामान्य नागरीकांकडून विचारण्यात येत होता तर बहुतांश नागरिक आपले काम न झाल्याने आल्या पावलीच परत जाताना दिसले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.