केंद्र सरकारने सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात सर्वांनी एकजुटीने दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाला सर्मथन देणे आवश्यक आहे असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रसंताच्या समाधी स्थळावरून व्यक्त केले. तर आता ज्या ज्या राज्यातुन आम्ही जाणार त्या त्या मुख्यमंर्यांना घेराव घालणार असा इशाराही बच्चू कडू यांनी बोलतांना दिला,यावेळी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग जवळपास दोन तास ठप्प होता यावेळी आंदोलन कर्त्यांनी ट्रकवर चढुन वाहन रोखले यावेळी रास्ता रोको केले यावेळी बच्चू कडू हे स्वत: दुचाकी चालवत प्रतवाड्याकडे रवाना झाले गुरुकुंज मोझरी येथून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दुचाकी मोर्चा काढून दिल्ली येथे तळ ठोकून असलेल्या शेतकर्यांच्या सर्मथनात एल्गार पुकारला असून बच्चू कडू व शेकडो कार्यकर्त्यांसह दिल्ली करिता रवाना झाले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दहा दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब व हरि याणा येथील शेतकरी आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याने कुठल्याही शेतकर्यांचे सर्मथन नसल्याने आज संपूर्ण भारतभर विविध पक्ष व संघटनेने आंदोलन पुकारले आहे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तीन दिवस आधी केंद्र सरकारला आंदोलन कर्त्या शेतकर्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा इशारा दिला होता अन्यथा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीला येऊन शेतकर्यांसोबत आंदोलन करू असादेखील इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला होता, आज प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्याच्या कान्याकोपर्यातुन राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी प्रहारचे हजारो कार्यकर्ते दुचाकी व टॅक्टरने दाखल झाले होते तेव्हा बच्चू कडू यांनी काही वेळ उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना सूचनासह मार्गदर्शन केले तेव्हा बोलत असताना राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. |