अमरावती : खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र

Share This News

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याच्या आधारावर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारविरोधात यापुढे वक्तव्य केल्यास चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी या पत्रातून खासदार राणा यांना देण्यात आली आहे.

आपण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेत बोलत होतो. त्यावेळी महाराष्ट्रातील वस्तुस्थिती सभागृहापुढे मांडली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने आपल्याला अॅसिड हल्ल्याची धमकी देण्यात आल्याचे खासदार राणा यांनी नमूद केले. राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनीही या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे. एखाद्या सरकारविरोधात बोलण्याचा अधिकार नसेल तर महाराष्ट्रात गुंडगिरीचे राज्य सुरू असल्याची टीका त्यांनी केली. राणा दाम्पत्य नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत आले आहे. त्यामुळे अशा धमक्यांमुळे आपण किंवा आपली पत्नी घाबरत नाही. जिथे चुकीचे घडत असेल, तिथे जीवाची पर्वा न करता आम्ही टीका करू, असे आमदार राणा यांनी स्पष्ट केले. राणा यांच्या निवासस्थानी प्राप्त झालेले धमकीचे पत्र त्यांनी पुढील चौकशीसाठी पोलिसांना दिले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.