अमरावती : वाघाच्या मृत्यूचा अहवाल सष्ट

Share This News

चिखलदरा (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या रायपूर वनपरिक्षेत्रातील उत्तर माडीझडप बिटमध्ये एक नर वाघ गुरुवारी पहाटे गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांना मृतावस्थेत आढळला होता. त्याचा मृत्यू पाच ते सहा दिवसापूर्वीच झाल्याचे प्राथिमक शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.  त्याचे शरीर पूर्णतः कुजलेले होते. परिणामी, मृत्यूच्या नेमक्या कारणासाठी वनविभागाला हैदराबाद व अमरावती येथील अहवालाची प्रतीक्षा आहे. वाघाच्या शरीरात अळ्या पडल्या होत्या. शरीर फुगले होते. व्याघ्र प्रकल्पाचे डॉ. प्रतीक जावरकर, सेमाडोह येथील डॉ. चिठोरे व डॉ. विजयकर यांनी त्या वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्याचा मृत्यू पाच ते सहा दिवसापूर्वीच झाल्याचे प्राथिमक शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.