विजेच्या धक्क्याने अडेगाव येथील ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू | An 11-year-old girl from Adegaon died due to electric shock

Share This News

यवतमाळ,दि.27ःःजिल्ह्यातील झरी तालुक्यातील अडेगाव येथे शुक्रवारला विजेच्या धक्क्याने एका ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
श्रृती किशोर थाटे (११)असे मृतक बालिकेचे नाव आहे.श्रृती हि ६ व्या वर्गातील विद्यार्थीनी असुन सकाळी ती ट्युशनला गेली होती.त्यानंतर ९ वाजता ती ट्युशन वरून घरी आली.आईला मदत होईल म्हणून ती कपडे धुवून सुकविण्यासाठी अंगणात असलेल्या तारांवर कपडे टाकताच तिला विजेचा जोरदार धक्का बसला.त्यानंतर तिला प्रथम उपचाकरीता मुकुटबन येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याकरीता हलविण्यात आले.मात्र तिथे पोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेची अधिक माहिती घेतली असता श्रृतीच्या घरावरुन विद्युत महामंडळाचे विजेचे तार गेलेले आहे.ते तार  काढण्याची मागणी केली होती परंतु काढण्यात आले नाही.त्यामुळे घरावरील टीन पत्र्यांच्या ऐंगलला बांधून असलेल्या ताराला विजेचा करंट मिळाला असेल, त्यामुळे अंगणात असलेल्या तारांवर कपडे टाकताच श्रृतीला विजेचा धक्का बसला असावा असे तिच्या नातेवाईकांतुन बोलले जात आहे.या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.