राज्य मंत्रिमंडळाची लवकरच तातडीची बैठक, लॉकडाऊनबाबत निर्णय होणार

Share This News

मुंबईः कोरोना संसर्गाचे रोजचे आकडे पन्नास हजाराला टेकले असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक दुपारी तीन वाजता बोलावण्यात आली असून या बैठकीत लॉकडाऊनच्या उपायावर नेमका निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनबाबत कालपासूनच प्रशासनाकडून संकेत दिले जात आहे. मात्र, आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लॉकडाऊनविरोधात मत व्यक्त केल्याने सरकारला अद्याप निर्णय घेता आलेला नाही. मात्र, रोजच्या रोज परिस्थिती गंभीर होत आहे. शनिवारी एकाच दिवशी राज्यात सुमारे ५० हजार कोरोना रुग्णांची भर पडली. त्यात मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपुरात परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सने पार पडणाऱ्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. मात्र, राज्यात सरसकट लॉकडाऊन लागणार की कसे, हे देखील तेव्हाच स्पष्ट होणार आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी अनेक संघटनांशी याबाबत चर्चा केली आहे. लॉकडाऊनला पर्याय नाही, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. लॉकडाऊनला उशिर लागल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊन आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील, अशा धोका व्यक्त केला जात आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.