टिप्परच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

Share This News

नागपूर : शहरातील हिंगणा पोलिस ठाणे हद्दीत टिप्परच्या धडकेत एका वृद्धाच्या मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा कान्होलीबारा, बस स्टॉप चौक, साई ढाबाजवळ, नागपूर येथे टिप्पर क्रमांक एमएच/४0/बी. एल/६४४४ चा आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजी व हयगयीने चालवून मागे घेऊन रामकृष्ण राजाराम मरस्कोल्हे, (वय ६0), रा. खडकी, कान्होलीबारा, हिंगणा नागपूर यांना धडक देऊन त्यांच्या मरणास कारणीभूत ठरला. याप्रकरणी फिर्यादी प्रल्हाद रामकृष्ण मरस्कोल्हे (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध कलम २७९, ३0४ (अ) भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.