अनिल देशमुख अन् नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; भाजपाची मागणी, राजकारण तापणार Anil Deshmukh and Nitin Raut should resign; BJP’s demand, politics will heat up
नागपूर: राजधानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता खंडित झाला होता. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. मात्र त्यादिवशी मुंबई अंधारात गेली, तो घातपातच होता, असा खुलासा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता. मुंबई अंधारात गेली होती, मुंबईतील वीजपुरवठा अचानक खंडीत झाला होता. त्यावेळी, मी घातपात असल्याचं सूतोवात मी केलं होतं. पण, अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की, तो घातपातच होता. यासंदर्भात सायबर विभागाकडून मला संध्याकाळी ६ वाजता अहवाल देण्यात येईल.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर हा रिपोर्ट मला मिळेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. वॉशिंग्टन पोस्टमध्ये जो रिपोर्ट आलाय, त्यासंदर्भातही सर्व माहिती मी तिथेच देईल,” असेही नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. मात्र नितीन राऊत यांच्या या विधानावरुन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे.