अनिल देशमुखांकडून वाझेंना दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट’; परबीर सिंग यांचा गंभीर आरोप

Share This News

अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप नुकतेच मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ८ पानी दीर्घ पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. या पत्रात सिंग यांनी अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर त्यांना मंत्र्यांनी कशा प्रकारची टार्गेट्स दिली होती, याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. या बरोबर कोणी कोणी वाझे यांना काय काय सांगितले होतं, याबाबतची धक्कादायक माहिती या पत्रात नमूद करण्यात आली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.